एक धर्मादाय देणगी ट्रस्ट आर्थिक देणग्या आणि इतर अनेक गोष्टींव्यतिरिक्त जनजागृती आणि वकिली प्रयत्नांद्वारे तातडीच्या सामाजिक आव्हानांना तोंड देते.
A charitable giving trust tackles urgent social challenges through public awareness and advocacy efforts in addition to financial donations & many more.
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "सिद्दीक सावंत" यांचा मित्र "विकास हरेल" याचं एक वर्षाचं बाळ "एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल" हाजी अली येथे उपचार घेत आहे आणि बाळाला उपचारादरम्यान A-Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्या मंडळाचे सभासद "चेतन मकवाना" यांनी स्वतः "एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल" मध्ये जाऊन बाळा साठी रक्तदान केले. आपण केलेल्या मदती मुळे बाळाच्या उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते बाळ सुखरूप आहे म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"चेतन भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम"
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Vikas Harel—a friend of our association member Siddiq Sawant—has a one-year-old baby undergoing treatment at SRCC Children's Hospital, Haji Ali. The baby required A-Positive blood during treatment, and the family contacted us; subsequently, our member Chetan Makwana personally visited SRCC Children's Hospital and donated blood for the baby.
The family praised and thanked our organization, noting that thanks to the help provided, there were no complications during the baby's treatment and the baby is now safe and well.
"Chetan-brother, I salute your dedication and promptness in action."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "कुलदीप पुजारे" यांचे मामा "उमेश भगत" हे "लोकमान्य टिळक म्युनिसिपल हॉस्पिटल" सायन येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारादरम्यान B+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "के ई म हॉस्पिटल ब्लड बँक" परळ येथून B+Positive ग्रुपच्या दोन बॅग रक्त उपलब्ध करून दिले. आपण केलेल्या मदती मुळे उमेश भाऊंना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"कोणाच्यातरी अडचणीत त्यासोबत उभं राहण, यापेक्षा मोठे सुख नाही या जगात"
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Mr. Umesh Bhagat—the maternal uncle of our association member, Mr. Kuldeep Pujare—is undergoing treatment at Lokmanya Tilak Municipal Hospital, Sion. He required B-positive blood during his treatment, and his relatives contacted us; we immediately arranged for two units of B-positive blood from the KEM Hospital Blood Bank in Parel.
Umesh-bhau faced no difficulties during his treatment thanks to the help provided, and he is now safe and well; consequently, his family has praised and thanked our association.
"There is no greater joy in this world than standing by someone in their time of need."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "विनोद तांबडे" यांच्या मित्राचे वडील "सुनील परशुराम राऊत" हे "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारादरम्यान तातडीने O-Negative रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला ही गरज लक्षात घेऊन आपल्या मंडळाचे सभासद "भावित तावडे" यांनी त्यांचा मित्र "अमरेश अशोक कांबळे" यास विनंती केली आणि त्या मित्राने आज "के ई म हॉस्पिटल" मध्ये जाऊन रक्तदान केले. आपण केलेल्या मदती मुळे सुनील भाऊंना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"भावित आणि त्यांचा मित्र अमरेश यांचे खुप खुप आभार"
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Mr. Sunil Parshuram Raut—the father of a friend of our association member Mr. Vinod Tambde—is currently undergoing treatment at KEM Hospital, Parel. He urgently required O-Negative blood, and his relatives contacted us regarding this need. Recognizing the urgency, our member Mr. Bhavit Tawde requested his friend, Mr. Amaresh Ashok Kamble, to help; Mr. Kamble subsequently visited KEM Hospital today and donated blood.
Sunil-bhau faced no difficulties during his treatment thanks to the help provided; now that he is safe and well, his family has praised and thanked our Mandal.
"Many thanks to Bhavit and his friend Amresh."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "भावित तावडे" यांच्या मैत्रीणीची आई "अनिता सरकारी" ह्या "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारादरम्यान B+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्या मंडळाचे सभासद "साहील सुर्वे" यांनी ताबडतोब "के ई म हॉस्पिटल" मध्ये जाऊन अनिता ताई साठी रक्तदान केले. आपण केलेल्या मदती मुळे अनिता ताईनां उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"साहील भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम"
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Anita Sarkari—the mother of a friend of our member Bhavit Tawde—is undergoing treatment at KEM Hospital, Parel, and required B-positive blood. Her relatives contacted us regarding this need, and our member Sahil Surve immediately went to KEM Hospital and donated blood for Anita-tai.
Anita-tai faced no difficulties during her treatment thanks to the help you provided, and she is now safe and well; her family has praised and thanked our organization for this.
"Salute to your promptness and dedication, brother Sahil."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "निखिल कोळी" यांचा मित्र "संतोष बाबुराव घोडेस्वार" ह्यांच्या पत्नी बाळंत पणा साठी "वाडिया हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारादरम्यान O-Negative रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्या मंडळाचे सभासद "भावित तावडे" यांनी स्वतः "वाडिया हॉस्पिटल" मध्ये जाऊन बाळाच्या आई साठी रक्तदान केले. आपण केलेल्या मदती मुळे बाळाच्या आईला उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या आणि होणार बाळ दोघेही सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"भावित भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम"
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
The wife of Santosh Baburao Ghodeswar—a friend of our association member Nikhil Koli—is undergoing treatment for childbirth at Wadia Hospital, Parel. During the treatment, she required O-Negative blood, and the patient's relatives contacted us regarding this need; consequently, our member Bhavit Tawde personally visited Wadia Hospital and donated blood for the mother.
Thanks to the help provided, the baby's mother faced no difficulties during her treatment, and both she and the unborn baby are now safe and healthy; consequently, the family has praised and expressed their gratitude to your organization.
"Salute to your dedication and promptness in action, dear Bhavit brother."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "वैभव बांडागळे" यांच्या परिचयातील "सविता पांडुरंग मोरे" ह्या "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारादरम्यान AB+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "मसीना हॉस्पिटल ब्लड बँक" भायखळा येथून AB+Positive च्या दोन बॅग रक्त उपलब्ध करून दिले. आपण केलेल्या मदती मुळे "सविता पांडुरंग मोरे" ताईना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"नावात पांडुरंग असलेल्या माऊली च्या मदतीचा योगायोग आज आषाढी एकादशीच्या दिवशी जुळून आला हे आमचं अहोभाग्य"
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Ms. Savita Pandurang More—an acquaintance of our association member Mr. Vaibhav Bandagale—is undergoing treatment at KEM Hospital, Parel. She required AB+ Positive blood during her treatment, and her relatives contacted us; we immediately arranged for two units of AB+ Positive blood from the Masina Hospital Blood Bank in Byculla.
Thanks to the assistance provided, Savita Pandurang More faced no difficulties during her treatment and is now safe and well; her family has expressed their appreciation and gratitude to our organization.
"We consider it a great privilege that the opportunity to help a lady named 'Pandurang'—a name associated with the Divine—coincided with the auspicious day of Ashadhi Ekadashi."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "केवीन अनिश कासारे" यांच्या शेजारी राहत असलेले "विलास केशव मर्चेंडे" हे "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां पायाच्या शस्त्रक्रिये दरम्यान O+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "मसीना हॉस्पिटल ब्लड बँक" भायखळा येथून O+Positive रक्त उपलब्ध करून दिले. आपण केलेल्या मदती मुळे "विलास केशव मर्चेंडे" यांना शस्त्रक्रिये दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करणे, हेच खऱ्या अर्थाने लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट चे मुख्य ध्येय आहे."
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Mr. Vilas Keshav Marchende, a neighbor of our association member Mr. Kevin Anish Kasare, is undergoing treatment at K.E.M. Hospital, Parel. He required O+ (O-Positive) blood during a leg surgery; his relatives contacted us, and we promptly arranged for the required O+ blood from the Masina Hospital Blood Bank in Byculla.
Thanks to the assistance provided, Mr. Vilas Keshav Marchende faced no complications during his surgery and is now safe and well; consequently, his family has praised and expressed their gratitude to our Mandal.
"Dedicating oneself to the service of others is, in the true sense, the primary mission of the Lalbaug Friends Circle Charitable Trust."
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे सभासद "शिवकुमार नंदी" यांच्या परिचयातील "राधिका पैर्मडले" ह्या "के जे सोमय्या हॉस्पिटल" सायन येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारा दरम्यान B+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "मसीना हॉस्पिटल ब्लड बँक" भायखळा येथून B+Positive रक्त गटाच्या दोन बॅग रक्त उपलब्ध करून दिले. आपण केलेल्या मदती मुळे "राधिका" ताई यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या सुखरूप आहेत म्हणून त्यांच्या कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
सेवा धर्मः परमः श्रेयः, परहितं कर्तव्यं सर्वदा।
दीनानामुपकारेण, हि जीवनं सम्पूर्णं भवेत्॥
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Radhika Pairmadle, an acquaintance of our association member Shivkumar Nandi, is undergoing treatment at K.J. Somaiya Hospital in Sion and required B-positive blood; her relatives contacted us, and we immediately arranged for two units of B-positive blood from the Masina Hospital Blood Bank in Byculla.
Radhika-tai faced no difficulties during her treatment thanks to the help provided; now that she is safe and well, her family has praised and expressed their gratitude to our organization.
Service is the highest virtue; one must always act for the welfare of others.
Life finds true fulfillment in helping the needy.
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे हितचिंतक "सुरज परब" यांचा मित्र रोहित कदम यांची आई "संध्या कदम" ह्या "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां एका शस्त्रक्रिये दरम्यान AB-Negative रक्ताची कमतरता भासली त्यासाठी कदम नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना AB-Negative रक्त उपलब्ध करून दिले. आपण केलेल्या मदती मुळे "संध्या कदम" ताई यांना शस्त्रक्रिये दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या सुखरूप आहेत म्हणून कदम कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
विशेष म्हणजे लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबिरात "सुरज परब" यांनी रक्तदान केले होते आज त्यांच्या मित्राच्या आईला गरज असताना आपण त्यांना ते उपलब्ध करून दिले.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Sandhya Kadam—the mother of Rohit Kadam, a friend of our association's well-wisher Suraj Parab—was undergoing treatment at KEM Hospital, Parel. During her surgery, there was a shortage of AB-Negative blood; the Kadam family contacted us, and we promptly arranged for the required blood. Thanks to your assistance, Sandhya Kadam faced no complications during the surgery and is now safe and well. The Kadam family has expressed their appreciation and gratitude to our association.
Notably, Suraj Parab had donated blood at a camp organized by the Lalbaug Friend Circle Charitable Trust; today, when his friend's mother was in need, he made that blood available to her.
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुपचा सभासद आणि सायकल यात्रा स्वार "अशोक जैस्वाल" याचा भाचा "सिद्धार्थ जैस्वाल" हा "सायन हॉस्पिटल" येथे उपचार घेत आहे आणि त्याला उपचारादरम्यान तातडीने A+Positive रक्ताची गरज भासली होती त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "मसीना हॉस्पिटल ब्लड बँक" मधून एक बॅग रक्त उपलब्ध करून दिले.
आपण केलेल्या मदती मुळे "सिद्धार्थ जैस्वाल" याला उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता तो सुखरूप आहे म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Siddharth Jaiswal—the nephew of our group member and cyclist Ashok Jaiswal—is undergoing treatment at Sion Hospital and urgently required A+ (A-positive) blood; his relatives contacted us regarding this, and we immediately arranged for a unit of blood from the Masina Hospital Blood Bank.
The patient's relatives praised and thanked your organization, noting that thanks to the help provided, "Siddharth Jaiswal" faced no difficulties during his treatment and is now safe and well.
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक वाढदिवस असा पण.."
"लालबागचा राजा" सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे, कार्यकारिणी सदस्य आणि लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्वेसर्वा श्री रूपेश अशोक जाधव यांचा २८ जून रोजी वाढदिवस होता याचे औचित्य साधून त्यांनी के ई म हॉस्पिटल परळ येथील परिसरात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप केले. हे आणि असे अनेक सामाजिक उपक्रम ते गेली कित्येक वर्ष करत आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातुन अशीच सत्कार्य घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
"A birthday like this too.."
To mark the occasion of the birthday of Shri Rupesh Ashok Jadhav—an executive committee member of the "Lalbaugcha Raja" Sarvajanik Ganeshotsav Mandal and the head of the Lalbaug Friends Circle Charitable Trust—he distributed food to patients and their relatives at KEM Hospital, Parel, on June 28th. He has been undertaking such social initiatives for many years; we pray to the Almighty that he is blessed with a long life and continues to perform such noble deeds.
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद
वैभव बंडागळे यांच्या जवळचे नातेवाईक विठ्ठल साहेबराव जाधव "जे जे हॉस्पिटल" भायखळा येथे उपचार घेत असून त्यानां काल उपचारादरम्यान तातडीने ओ पॉसिटीव्ह रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "जे जे हॉस्पिटल ब्लड बँक" ची दोन कार्ड सुपूर्द केली व त्यांना त्या ब्लड बँक मधून दोन बॅग रक्त उपलब्ध झाले.
आपण केलेल्या मदती मुळे "विठ्ठल साहेबराव जाधव" यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"जनसेवा हीच ईश्वर सेवा" लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट कडून अशी कार्य वारंवार घडो हीच मनोकामना.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Vitthal Sahebrao Jadhav, a close relative of our group member Vaibhav Bandagale, is undergoing treatment at JJ Hospital, Byculla. Yesterday, during his treatment, there was an urgent need for O-positive blood. The patient's relatives contacted us, and we immediately handed over two cards for the JJ Hospital Blood Bank, enabling them to obtain two bags of blood from the facility.
Thanks to the assistance provided, Mr. Vitthal Sahebrao Jadhav faced no difficulties during his treatment; consequently, the patient's relatives praised and expressed their gratitude to the organization.
"Service to the people is service to God"—it is our sincere wish that the Lalbaug Friend Circle Charitable Trust continues to carry out such noble work.
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद दुर्गेश भाटी यांच्या जवळचा मित्र राजेश धामापूरकर यांची पत्नी "के ई म हॉस्पिटल" परळ येथे प्री-डिलिव्हरीसाठी उपचार घेत होती आणि त्यानां उपचारादरम्यान तातडीने ओ पॉसिटीव्ह रक्ताच्या चार बॅग ची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "के ई म हॉस्पिटल आणि जे जे हॉस्पिटल ब्लड बँक" चे चार कार्ड सुपूर्द केले व त्यांना त्या ब्लड बँक मधून चार बॅग रक्त उपलब्ध झाले.
आपण केलेल्या मदती मुळे "बाळाची आई आणि नवजात बालक" यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते दोघेही सुखरूप आहेत म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"जनसेवा हीच ईश्वर सेवा" लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट कडून अशी कार्य वारंवार घडो हीच मनोकामना.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
The wife of Rajesh Dhamapurkar—a close friend of our group member Durgesh Bhati—was undergoing pre-delivery treatment at KEM Hospital, Parel, and urgently required four units of O-positive blood. The patient's relatives contacted us, and we immediately handed over four blood bank cards (for KEM Hospital and JJ Hospital blood banks) to them, enabling them to procure the four units of blood.
The patient's relatives praised and thanked the Mandal, noting that thanks to the assistance provided, the mother and newborn faced no difficulties during treatment and are now both safe and well.
"Service to the people is service to God"—it is our sincere wish that the Lalbaug Friend Circle Charitable Trust continues to carry out such noble work.
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आमचे मित्र नितिन घाग (अलिबाग) यांचे नातेवाईक संदेश बलराम ठाकूर मु. शिरगांव (मुरुड /अलिबाग) यांचे वडील के ई म हॉस्पिटल परळ मध्ये उपचार घेत असून त्यानां उपचारादरम्यान तातडीने बी पॉसिटीव्ह रक्ताची गरज भासली, आपल्या ग्रुप चे सभासद संतोष मयेकर (स्टार भाऊ) यांच्याशी सकाळी संपर्क साधला त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता होकार दिला आणि केवळ 10 मिनटात के ई म हॉस्पिटल मध्ये फोन करून बी पॉसिटीव्ह रक्तगटाची व्यवस्था करून दिली. 🙏
भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम आज तुझ्या मुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या सर्वांन तर्फे संतोष मयेकर (स्टार भाऊ) याचे शतशः आभार 🙏
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Sandesh Balaram Thakur—a relative of our friend Nitin Ghag (Alibag) and a resident of Shirgaon (Murud/Alibag)—had a father undergoing treatment at KEM Hospital, Parel, who urgently required B-positive blood. We contacted our group member Santosh Mayekar (Star Bhau) in early morning; without a moment's hesitation, he agreed to help and arranged for the B-positive blood at KEM Hospital within just ten minutes.
Brother, I salute your dedication; today, thanks to you, the patient's relatives praised our Mandal and expressed their gratitude.
On behalf of the Lalbaug Friend Circle Charitable Trust and all of us, a heartfelt thank you to Santosh Mayekar (Star Bhau).
Gratefully yours,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद "नितीन मोदी" यांच्या जवळचे नातेवाईक "पांडुरंग मोदी" हे "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां काल उपचारादरम्यान तातडीने O+Positive रक्ताच्या तीन बॅग ची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "जे जे हॉस्पिटल ब्लड बँक" मधून तीन बॅग रक्त उपलब्ध करून दिले.
आपण केलेल्या मदती मुळे "पांडुरंग मोदी" यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते सुखरूप आहेत म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"रक्ताची गरज तुम्हाला भासेल जेव्हा जेव्हा लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्या मदतीला धावून येईल तेव्हा तेव्हा".
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Pandurang Modi, a close relative of our group member Nitin Modi, is undergoing treatment at KEM Hospital, Parel. Yesterday, during his treatment, there was an urgent need for three units of O-positive blood. The patient's relatives contacted us, and we immediately arranged for the three units of blood to be made available from the JJ Hospital Blood Bank.
The patient's relatives praised and thanked your organization, noting that thanks to your assistance, Mr. Pandurang Modi faced no difficulties during his treatment and is now safe and well.
"Whenever you are in need of blood, the Lalbaug Friend Circle Charitable Trust will rush to your aid."
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद "शिवाजी लाड आणि तानाजी लाड " यांचा मित्र "आर्यन जगताप" चे वडील "राजू जगताप " हे "लायन ताराचंद हॉस्पिटल" सायन येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां काल उपचारादरम्यान तातडीने O+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "जे जे हॉस्पिटल ब्लड बँक" मधून रक्त उपलब्ध करून दिले.
आपण केलेल्या मदती मुळे आपल्या मित्राचे वडील "राजू जगताप " यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता ते सुखरूप आहेत म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
विशेष म्हणजे आपला मित्र "आर्यन जगताप" याने लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित रकदान शिबिरात रक्तदान केले होते आणि आज त्याच्या वडिलांना गरज असताना ते रक्त परत मिळाले हेच आपण कामावलेलं यश.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Mr. Raju Jagtap—the father of Aryan Jagtap, a friend of our group members Shivaji Lad and Tanaji Lad—is currently undergoing treatment at Lion Tarachand Hospital in Sion. Yesterday, during his treatment, there was an urgent need for O+ (O-Positive) blood. The patient's relatives contacted us, and we immediately arranged for the blood to be made available from the JJ Hospital Blood Bank.
The patient's relatives praised and thanked your organization, noting that thanks to your assistance, your friend "Raju Jagtap" faced no difficulties during his treatment and is now safe and well.
Notably, your friend "Aryan Jagtap" had previously donated blood at a camp organized by the Lalbaug Friend Circle Charitable Trust; the fact that his father received blood when he needed it today is a true testament to the value of that contribution.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद महेश अशोक जाधव (नाना) यांच्या ओळखीच्या मित्राच्या नातेवाईक "संगीता बाळू गावडे" ताई ह्या "सायन हॉस्पिटल" मध्ये उपचार घेत असून त्यानां उपचारादरम्यान तातडीने "बी पॉसिटीव्ह" रक्ताची गरज आहे असा काल ग्रुप वर मेसेज आला आणि आपल्या ग्रुप चे सभासद "तानाजी लाड" याने त्वरित रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि आज स्वतः सायन हॉस्पिटल मध्ये जाऊन त्या ताईस रक्तदान केले.
भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम "संगीता ताई" आता सुखरूप आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या सर्वांन तर्फे "तानाजी लाड" याचे शतशः आभार.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
A message was received on the group yesterday stating that Sangeeta Balu Gavde—a relative of a friend known to group member Mahesh Ashok Jadhav (Nana)—was undergoing treatment at Sion Hospital and urgently required 'B-Positive' blood. Group member Tanaji Lad immediately contacted the patient's relatives, went to Sion Hospital today, and personally donated blood for her.
Brother, we salute your promptness and dedication to the cause. "Sangita Tai" is now safe; her relatives have praised our Mandal and expressed their gratitude.
On behalf of the Lalbaug Friend Circle Charitable Trust and all of us, we extend our heartfelt thanks to "Tanaji Lad."
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद "समीर चोरगे" यांच्या जवळच्या मित्राची आई "मंगला सुदाम साळवे" ह्या "ट्युलिप हॉस्पिटल" प्रभादेवी येथे उपचार घेत होत्या आणि त्यानां उपचारादरम्यान तातडीने A+Positive रक्ताची गरज भासली होती त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "जे जे हॉस्पिटल ब्लड बँक" मधून दोन बॅग रक्त उपलब्ध करून दिले.
आपण केलेल्या मदती मुळे "मंगला सुदाम साळवे" ताई यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या सुखरूप आहेत याची पोचपावती म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Mangala Sudam Salve—the mother of a close friend of our group member Sameer Chorge—was undergoing treatment at Tulip Hospital, Prabhadevi, and urgently required A+ (A-positive) blood. Her relatives contacted us, and we immediately arranged for two units of blood from the JJ Hospital Blood Bank.
The patient's relatives praised and thanked your organization, acknowledging that thanks to the assistance provided, "Mangala Sudam Salve" faced no difficulties during her treatment and is now safe and well.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद "संकेत भुजबळ" यांच्या जवळच्या मित्राची बहीण "प्रियांका पाटील" ह्या "वाडिया हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहेत आणि त्यानां उपचारादरम्यान तातडीने O-Negative रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्या ग्रुप चा सभासद "राहुल अडेपू" याने आज "वाडिया हॉस्पिटल" मध्ये जाऊन प्रियांका ताई साठी रक्तदान केले.
आपण केलेल्या मदती मुळे "प्रियांका पाटील" ताई यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या व होणार बाळ दोन्ही सुखरूप आहेत याची पोचपावती म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
राहुल भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Priyanka Patil—the sister of a close friend of our group member Sanket Bhujbal—is currently undergoing treatment at Wadia Hospital in Parel. She urgently required O-Negative blood during her treatment, and her relatives contacted us regarding this need; consequently, our group member Rahul Adepu visited Wadia Hospital today and donated blood for Priyanka.
Thanks to the assistance provided, Priyanka Patil faced no difficulties during her treatment; the patient's relatives praised and thanked our organization, confirming that both she and her unborn baby are safe and well.
Rahul, I salute your promptness and dedication to the cause.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या मंडळाचे चे हितचिंतक "पवार बंधू" यांच्या आज्जी "शीला पवार" ह्या "के ई म हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत होत्या आणि त्यानां उपचारादरम्यान O+Positive रक्ताची कमतरता भासली त्यासाठी पवार नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना O+Positive रक्त उपलब्ध करून दिले.
आपण केलेल्या मदती मुळे "शीला पवार" आज्जी यांना उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता त्या सुखरूप आहेत म्हणून पवार कुटुंबानी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
"रक्ताची गरज तुम्हाला भासेल जेव्हा जेव्हा लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्या मदतीला धावून येईल तेव्हा तेव्हा".
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Mrs. Sheela Pawar—the grandmother of the "Pawar Brothers," who are well-wishers of our association—was undergoing treatment at KEM Hospital, Parel. During her treatment, she required O-positive blood; the Pawar family contacted us, and we promptly made the necessary blood available.
Thanks to your assistance, Mrs. Sheela Pawar faced no complications during her treatment and is now safe and well. The Pawar family has expressed their appreciation and gratitude to our association for this help.
Whenever you are in need of blood, the Lalbaug Friend Circle Charitable Trust will rush to your aid.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद "सिद्धिक सावंत" यांच्या जवळचा मित्र "अविनाश अशोक डोळस" हा "गांधी हॉस्पिटल" परळ येथे उपचार घेत आहे आणि त्याला उपचारादरम्यान तातडीने A+Positive रक्ताची गरज भासली त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्याशी संपर्क साधला आणि आपण लगेच त्यांना "जे जे हॉस्पिटल ब्लड बँक" मधून दोन बॅग रक्त उपलब्ध करून दिले.
आपण केलेल्या मदती मुळे "अविनाश डोळस" याला उपचारा दरम्यान कोणतीही अडचण आली नाही आणि आता तो सुखरूप आहे म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Avinash Ashok Dolas, a close friend of our group member Siddhik Sawant, was undergoing treatment at Gandhi Hospital in Parel and urgently required A+ (A-Positive) blood. His relatives contacted us, and we immediately arranged for two units of blood from the JJ Hospital Blood Bank.
Thanks to this assistance, Avinash Dolas faced no complications during his treatment and is now safe and well; consequently, his relatives have praised and expressed their gratitude to our group.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद अश्विन गायकर यांच्या नातेवाईकाचे बाळ वाडिया हॉस्पिटल परळ मध्ये उपचार घेत असून बाळाला उपचारादरम्यान आज बी पॉसिटीव्ह रक्ताची तातडीने गरज भासली यासाठी आपण आपल्या ग्रुप मध्ये मेसेज केला ग्रुप चे सभासद जय पटेल यांनी त्वरित बाळाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि बाळाला ते रक्त अत्यंत कमी वेळात उपलब्ध करून दिले.
भावा तूझ्या कार्य तत्परतेला सलाम आता ते बाळ सुखरूप आहे आणि बाळाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या सर्वांन तर्फे जय पटेल यांचे शतशः आभार
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
A relative's baby of our group member, Ashwin Gaikar, is undergoing treatment at Wadia Hospital in Parel and urgently required 'B Positive' blood today. After a message was posted in the group regarding this, member Jay Patel immediately contacted the baby's relatives and arranged for the blood to be made available in a very short time.
Brother, I salute your promptness and dedication to the task; the baby is now safe, and the baby's relatives have praised and thanked our Mandal.
A heartfelt thank you to Jai Patel on behalf of the Lalbaug Friend Circle Charitable Trust and all of us.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे सभासद शिवा लाड आणि तानाजी लाड यांचे जवळचे नातेवाईक ग्लोबल हॉस्पिटल परळ मध्ये ICU मध्ये उपचार घेत असून त्यानां उपचारादरम्यान तातडीने ओ पॉसिटीव्ह रक्ताची गरज भासली यासाठी आपण काल आपल्या ग्रुप चे सभासद प्रितम प्रकाश कलवार आणि निखिल चंद्रकांत कोळी यांच्याशी संपर्क साधला या दोघांनी क्षणाचा ही विलंब न करता होकार दिला आणि केवळ अर्ध्या तासात ग्लोबल हॉस्पिटल मध्ये जाऊन त्या रुग्णास रक्तदान केले.
भावा तुमच्या कार्य तत्परतेला सलाम आज तुमच्या मुळे त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या सर्वांन तर्फे प्रितम प्रकाश कलवार आणि निखिल चंद्रकांत कोळी या दोघाचें शतशः आभार
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
Close relatives of our group members, Shiva Lad and Tanaji Lad, are currently undergoing treatment in the ICU at Global Hospital, Parel, and urgently required O-positive blood. We contacted fellow group members Pritam Prakash Kalwar and Nikhil Chandrakant Koli regarding this; without a moment's hesitation, both agreed and reached Global Hospital within just half an hour to donate blood to the patient.
Brother, I salute your dedication. Thanks to you, the patient's relatives praised our organization and expressed their gratitude.
On behalf of the Lalbaug Friend Circle Charitable Trust and all of us, we extend our heartfelt thanks to both Pritam Prakash Kalwar and Nikhil Chandrakant Koli.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
आपल्या ग्रुप चे हितचिंतक "युवराज चव्हाण' यांच्या जवळच्या नातेवाईकाचे नवजात बाळ ग्लोबल हॉस्पिटल परळ मध्ये उपचार घेत असून त्या बाळाला उपचारादरम्यान तातडीने B-Negative रक्ताची गरज भासली यासाठी आपण काल आपल्या ग्रुप चे सभासद "वरद विनोद शेट्ये" यांच्याशी संपर्क साधला आणि वरद ने क्षणाचा ही विलंब न करता होकार दिला आणि आज स्वतः हा जाऊन ग्लोबल हॉस्पिटल मध्ये जाऊन त्या बाळासाठी रक्तदान केले.
भावा तुझ्या कार्य तत्परतेला सलाम आज तुझ्यामुळे त्या बाळाच्या नातेवाईकांनी आपल्या मंडळाचे कौतुक केले आणि आभार मानले.
आपला आभारी
लालबाग फ्रेंड् सर्कल चॅरिटेबल ट्रस्ट
"A helping hand.."
The newborn baby of a close relative of our group's well-wisher "Yuvraj Chavan" is undergoing treatment at Global Hospital Parel and during the treatment, the baby urgently needed B-Negative blood. Yesterday, we contacted our group member "Varad Vinod Shetye" and Varad agreed without a moment's hesitation and today he himself went to Global Hospital and donated blood for the baby.
Brother, I salute your dedication; today, thanks to you, the baby's relatives praised our Mandal and expressed their gratitude.
Yours gratefully,
Lalbaug Friend Circle Charitable Trust
"एक हात मदतीचा.."
फेब्रुवारी २०२४ मध्ये संस्थेचे एक जुने सभासद यांच्या ३ वर्षाच्या चिमुकल्याला पॅरॅलिसिस या आजाराने ग्रासले आणि योग्य उपचारासाठी जि.रायगड येथून मुंबईतील वाडिया हॉस्पिटल येथे आणण्यात आले. त्या चिमुकल्याला या आजारातून मुक्त करण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपीची गरज होती आणि त्यासाठी एक मोठी रक्कम जमा करायची होती. अचानक आलेल्या या मेडिकल इमर्जन्सी मध्ये काय करावे हे त्या सभासदाला आणि त्याच्या परिवाराला कळेनासे झाले होते पण ही गोष्ट जेव्हा संस्थेच्या निदर्शनास आली क्षणाचा ही विलंब न करता संस्थेने "एक हात मदतीचा.." ही छोटीशी मोहीम राबवली आणि एक मोठी रक्कम जमा करून बाळाच्या उपचारासाठी त्याच्या परिवाराला सुपूर्द केली. आज त्या मुलाच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आहे आणि तो सुखरूप आणि आनंदी आयुष्य जगत आहे.
"A helping hand.."
In February 2024, the 3-year-old child of an old member of the organization suffered from paralysis and was brought from Raigad district to Wadia Hospital in Mumbai for proper treatment. The little child needed occupational therapy to get rid of this disease, and a large sum of money had to be raised for that. The member and his family were at a loss as to what to do in this sudden medical emergency, but when the organization came to the attention of the organization, without a moment's delay, the organization "lent a helping hand." This small campaign was carried out and a large amount of money was collected and handed over to the baby's family for his treatment. Today, the boy's health has improved significantly and he is living a happy and healthy life.
"कोरोना काळातील उपक्रम"
कोरोना सारखं संकट निर्माण झालं होतं आणि अक्ख जग थांबलं होतं परंतु या संस्थेचे काही सभासद के ई म आणि टाटा हॉस्पिटल बाहेर गरजवंताना तयार जेवणाचे पॅकेट्स वाटत होते. रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांन ची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थेची रुग्णवाहीका अखंडित चालवत होते. स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेऊन निस्वार्थी भावनेने त्यांनी जे उल्लेखनीय कार्य केले त्या सभासदांचं जितकं कौतुक करू कमीच आहे.
"Corona Era Activities"
There was a crisis like Corona and the entire world had come to a standstill, but some members of this organization were distributing ready-made food packets to the needy outside KEM and Tata Hospitals. The organization's ambulances were operating continuously to avoid inconvenience to patients and their relatives. There is little that can be said to praise the members for the remarkable work they have done with a selfless spirit, taking care of themselves and their families.
"अन्नदान हे केवळ पोट भरणे नाही, तर ते जीवनाला अर्थ देणारे, आदराचे आणि पुण्याचे कार्य आहे."
असेच कार्य आमच्या हातून वारंवार घडावे
कधी कोणाला दोन घास कमी ना पडावे....
टाटा हॉस्पिटल परळ येथे दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान.
"Food donation is not just about filling the stomach, it is an act of giving meaning to life, respect and virtue."
Such an act should be done by us often
Never let anyone lack two grains....
Food donation to patients and their relatives at Tata Hospital Parel on December 21, 2025.
"इतर सामाजिक उपक्रम"
गरिबांना/गरजु महिलांना अन्न-धान्य वाटप
शालेय विद्याथ्यांना/अनाथ मुलांना शैक्षणिक वस्तू वाटप
रुग्णांना फळ आणि औषधं वाटप
रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत
रक्तदान शिबीर
हे आणि असे अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था गेले कित्येक वर्ष राबवत आहे.
"Other social activities"
Distribution of food grains to the poor/needy women
Distribution of educational items to school students/orphans
Distribution of fruits and medicines to patients
Financial assistance to relatives of patients
Blood donation camp
This organization has been implementing these and many other social initiatives for the past several years.